आनंदाची बातमी : कोरोना लस पालघर जिल्ह्यात दाखल

0
847

पालघर, दि. 14 : अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या  कोविड-19 लसीची प्रतीक्षा अखेर  संपली असून ही लस पालघर जिल्ह्यात दाखल झाली आहे. पालघरमधील मध्यवर्ती औषध भांडार  येथे ही लस ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात 16 जानेवारीला  सहा ठिकाणांहून हे लसीकरण होणार असून यात डहाणू उपजिल्हा रुग्णालय, जव्हार उप रुग्णालय, वाडा ग्रामीण रुग्णालय, पालघर ग्रामीण रुग्णालय तसेच वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये वरून इंडस्ट्रीज या ठिकाणी लसीकरणाची पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार आहे. करोना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य विभागामार्फत रंगीत तालीम अलीकडेच घेण्यात आले असून यासंदर्भात सर्व ते सुसज्ज नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयामार्फत 16 जानेवारी रोजी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल.

Print Friendly, PDF & Email

comments