जिल्ह्याच्या पालक सचिवांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा

0
209

पालघर, दि. 12 : पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालघर जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजय चहांदे यांनी पालघरला भेट देऊन जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतला. तसेच विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी चहांदे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चहांदे यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना विभागाला असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हा मुख्यालय उभारत असलेल्या सिडको प्रशासनाकडूनही त्यांनी अनेक बाबींचा आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला चहांदे यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यातील करोना स्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू, सद्यस्थितीत दाखल रुग्ण व आतापर्यंत बरे झालेले रुग्ण अशी सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. यानंतर जिल्ह्यातील महसूल, कृषी, भूसंपादन, क्रीडा, नगररचना, वनहक्क आदी विभागांचा त्यांनी संबंधित विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात वाटप झालेल्या पिक विम्याबद्दलही पालक सचिव चहांदे यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर चहांदे यांनी जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांची प्राधान्याने माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पाणी पुरवठा, जलजीवन मिशन आदी विभागांच्या कामकाजाचा व विकासात्मक दृष्टीने होत असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी प्रत्येक विभागाच्या रिक्त पदांबद्दलही माहिती जाणून घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई- विरार महापालिका आयुक्त डी. गंगाधरन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments