पालघर: भाजपचे आंदोलन जिल्हा प्रशासनाने नियंत्रित केले; तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!

0
929

पालघर दि. 20 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षातर्फे आज सकाळी 11 वाजता विविध प्रश्नांसाठी पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार होता. जिल्हा भरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सामील होणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने हे आंदोलन मर्यादीत व्हावे यासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना रोखून धरले. काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैद करण्यात आली. त्यामुळे हा मोर्चा रद्द झाल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आजचा मोर्चा रद्द झाला असला तरी माजी पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे, माजी आमदार पास्कल धनारे, बापजी काठोळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत उपस्थित होते. स्थानिक भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर रोखून धरण्यात आले.

Print Friendly, PDF & Email

comments