केळवा : तरुणींना फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लिल मॅसेज करणारा तरुण गजाआड

0
1209

पालघर, दि. 16 : केळव्यातील एका तरुणीला फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्‍लिल मॅसेज पाठविणार्‍या तरुणाला सातारा येथून अटक करण्यात आली आहे. केळवे पोलिसांनी पालघर सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई केली असुन सोहन सुरेश डेरे (वय 25) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी तरुण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील रहिवासी असुन काही दिवसांपुर्वी त्याने केळवे येथील एका तरुणीला आपल्या फेक इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अश्‍लिल मॅसेजेस केले होते. तरुणीने याबाबत केळवे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंगासह आयटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. केळवे पोलिसांनी पालघर सायबर सेलशी समन्वय साधून या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर सदर फेक अकाऊंट हे सातारा जिल्ह्यातून वापरले जात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांच्या एका पथकाने काल, 15 ऑक्टोबर रोजी सातारा गाठत कवठे या गावातून त्याला अटक केली.

आरोपी सोहन डेरे याने आपल्या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुन अनेक तरुणींना अशाप्रकारचे अश्‍लिल मॅसेज केल्याचे त्याच्या चौकशीत समोर आहे.

Print Friendly, PDF & Email

comments