पालघर, दि. 16 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता शासनाच्या विविध कर्ज योजना व सवलतींबाबत विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आपल्या योजनेची माहिती ऑनलाईन वेबिनारद्वारे देणार आहेत. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कर्ज योजनांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हा वेबिनार आयोजित करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आयटीआय, तसेच इतर शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा पालघर जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.