दिनांक 23 January 2018 वेळ 3:18 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » आहरण व संवितरण अधिकार्‍यांचा जीएसटी कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

आहरण व संवितरण अधिकार्‍यांचा जीएसटी कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

पालघर, दि. cropped-LOGO-4-Online.jpg9 : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकार्‍यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वस्तू व सेवा कर कायद्याखाली टिडीएस संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर विभागाच्या वस्तू व सेवा कर खात्याच्या वतीने आयोजित या कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण संवितरण अधिकार्‍यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यकर उपायुक्त विनोद पाटील, राज्यकर अधिकारी गिरीश संखे, सहाय्यक राज्यकर आयुक्त रा. ना. मेश्राम, पालघर जिल्हा कोषागार अधिकारी विकास खोळपे, राज्यकर अधिकारी (नोंदणी शाखा) श्रीकांत संखे, मनोहर कानडे, नरोत्तम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व आहरण व संवितरण अधिकार्‍यांना वस्तू व सेवा कर कायद्यांअंतर्गत टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वस्तू व सेवा कर पोर्टलवर टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. आहरण व संवितरण अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे व अडचणींचे निराकरणही करण्यात आले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top