दिनांक 23 February 2018 वेळ 12:11 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » डहाणूतील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत सुयश

डहाणूतील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत सुयश

डहाणू, दि. DAHANU KARATE SPRADHA09 : फायर विंग्स मार्शल आर्ट-वर्ल्ड कंकोशी शोतोकान कराटे संस्थेतर्फे 6 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांनी दणदणीत यश प्राप्त केले आहे.
ठाणे येथील श्रीमती सावित्री देवी शिराई विद्यामंदिर येथे या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. यात काता प्रकारात मुलांच्या 14 वर्षाच्या गटात धु्रवल प्रकाश पाटील याने सुवर्ण पदक पटकावले. तर मुलांच्या 9 वर्षाच्या गटात भुमिक प्रकाश पाटील याने काता प्रकारात रजत पदक व कुमिते प्रकारात कांस्य पदक पटकावत सुयश मिळवले. या विद्यार्थ्यांना डहाणूतील इराणी रोड येथील जलाराम मंदिरासमोरील लायन्सपार्क येथे सुरु असलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षक कैलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

comments

About Rajtantra

Scroll To Top