दिनांक 23 January 2018 वेळ 3:22 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » पालघर : भूमि अभिलेख व साहित्यांच्या प्रदर्शन शिबीराचे उद्घाटन

पालघर : भूमि अभिलेख व साहित्यांच्या प्रदर्शन शिबीराचे उद्घाटन

पालघर, दि. 9 : पालघर जिल्हा तृतीय वर्धापन दिन व 9 ऑगस्ट 2017 रोजी जागतिक दिनाचे औचित्य साधून पालघर भूमि अभिलेख विभागाच्या वतीने भूमीअभिलेख व मोजणी साहित्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातीBHUMI ABHILEKH PRADARSHANल सभागृहात झाले. या प्रदर्शनाची डॉ. पाटील यांनी प्रशंसा केली तर मान्यवरांकडून प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली.
या प्रदर्शनास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी सतीश देशमूख, भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक डॉ. लालसिंग मिसाळ आदी मान्यवर उपस्थितीत होते. या प्रदर्शनात भुमी अभिलेख विभागाचा पुरातन काळापासुन होत गेलेला विकास, जमाबंदी आणि मोजणीमध्ये ब्रिटिश अधिकार्‍यांनी दिलेल्या योगदानास उजाळा देण्यात आला. आजच्या वापरात असलेल्या मोजणीच्या साहित्यांची ओळख व विभागाकडून नागरिकांना वितरित करण्यात येणार्‍या अभिलेखांच्या नकलांची सविस्तर माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली. भुमी अभिलेख विभागाचे सर्व उपअधिक्षक व कर्मचारी यांच्यावतीने सदर प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनास नागरिक व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top