डहाणू दि. 5 ऑक्टोबर: डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे 28 सप्टेंबर 2020 रोजी घडलेल्या एका दरोड्याच्या प्रकरणात पोलीसांनी वाढवण येथील गौरव भूपेंद्र दळवी या तरुणास अटक केली आहे. गौरवने आणखी 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास चिंचणी पाटीलपाडा येथील काशिनाथ पुरुषोत्तम पाटील यांच्या घरात चोर शिरला होता. या चोराला शितल पाटील व दीपक सावे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करुन आरोपी पळून गेला. मात्र आरोपीची एम.एच. 04 डी.यू. 8369 मोटारसायकल तिथेच राहिली. पोलीसांनी शोध घेतला असता ही मोटारसायकल चोरीची निघाली. पोलीसांनी तपास केला असता ही मोटारसायकल डहाणू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मल्याण नाका 10 सप्टेंबर येथून चोरी झाल्याची फिर्याद नोंदवली गेल्याचे आढळले. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली.
3 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पथकाने आरोपी गौरवची धरपकड केल्यानंतर त्याने चिंचणी येथील दरोड्याची, डहाणूतील मोटरसायकल चोरीची व वाणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अन्य एक चोरीची कबूली दिली आहे. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाणगांवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
- धोक्याची घंटा : पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसात ‘एवढे’ रुग्ण वाढले!
- करोना : बोईसरचा आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
- पालघर : 17 दिवंगत पोलिसांच्या पाल्यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती; पोलीस महासंचालकांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
- पालघर : नौसैनिक हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
- … तर, जिल्ह्यातील मंगल कार्यालये व रिसॉर्ट मालकांवर होणार कारवाई