दिनांक 23 January 2018 वेळ 3:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त डहाणू नगरपरिषदेची स्वच्छता मोहिम

पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त डहाणू नगरपरिषदेची स्वच्छता मोहिम

दि. 04 : पालघर जिल्ह्याच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार व डहाणू सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आज डहाणू नगरपरिषदेतर्फे स्cropped-LOGO-4-Online.jpgवच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी डहाणू शहराला लाभलेल्या निसर्गरम्य समुद्र किनार्‍याची नागरीकांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली. पहाटे 6.30 वाजेपासुन या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. पारनाका ते नगर परिषद हद्दीतील नरपडपर्यंतच्या समुद्रकिनार्‍याची साफसफाई करताना येथून तब्बल 700 ते 800 किलो प्लॅस्टिक व इतर घनकचरा जमा करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तसेच यापुढेही वेळोवेळी समुद्र किनार्‍याची सफाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या स्वच्छता मोहिमेत डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल, डहाणू व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगरसेवक-नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांसह के. एल. पोंदा हायस्कुलचे शिक्षक, विद्यार्थी व शहरातील नागरीक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top