कोरोना : बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ!

0
3969

पालघर, दि. 11 : पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज, 11 ऑगस्ट रोजी 130 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विशेष म्हणजे एकट्या बोईसरमध्ये तब्बल 71 नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ मानली जात आहे.

पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज एकूण 178 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालया तर्फे देण्यात आली आहे. यात पालघर मधील 130, डहाणूमधील 23, वसई ग्रामीणमधील 13, तर उर्वरित तालुक्यातील 12 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान पालघर तालुक्यातील बोईसर भागातील रुग्ण वाढीची संख्या गंभीर बनत चालली असून आज या भागात 71 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments