दिनांक 24 February 2018 वेळ 11:37 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » धाकटी डहाणू शाळेचा कायापालट! केंद्रप्रमुख व शिक्षिकेच्या कार्याची शासनाकडून दखल

धाकटी डहाणू शाळेचा कायापालट! केंद्रप्रमुख व शिक्षिकेच्या कार्याची शासनाकडून दखल

DHAKTI DAHANU SHALA2विविध संस्था, शासकीय योजना व लोकसहभागातून धाकटी डहाणू जिल्हा परिषद शाळा क्र. 2 चा कायापालट करणार्‍या केंद्रप्रमुख व शिक्षिकेच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येणार आहे. केंद्रप्रमुखDHAKTI DAHANU SHALA3 विजय पाटील व उपशिक्षिका केतकी केतन संखे यांनी अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेचे आधुनिक डिजीटल शाळेत रुपांतर केले आहे.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या प्राथमिक शाळेत पूर्णत: आधुनिक वाचनालय, विज्ञान प्रयोग शाळा यांसह विविध सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यात वसुंधरा ट्रस्ट, रिलायन्स एनर्जी डहाणू अशा विविध संस्था व सांसद आदर्श ग्राम विकास योजनेतून मदत मिळवून तसेच लोकसभागातून 53 हजार रुपये जमा करून शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता यावे याकरीता प्रोजेक्टर व इतर शैक्षणिक साहित्यांची खरेदी करून त्या सर्वांचा यशस्वीरित्या वापर केला जात आहे. या शाळेची पटसंख्या 128 असून चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमातील व खाजगी शाळेतील 22 मुले या शाळेत दाखल झाली आहेत. या शिक्षकांनी आपल्या कार्यातूनएक नवीन आदर्श निर्माण केला असून त्यांच्या या निस्वार्थी सेवेची दखल जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आली असून लवकरच या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच पालकांनीही या शाळेचे भरभरून कौतुक केले असून आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्याबाबत समाधान वक्त केले आहे. सर्व शिक्षकांनी याप्रमाणे पुढाकार घेऊन आपापल्या परीने मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांची नक्कीच जलद गतीने प्रगती होण्यास मदत होईल, अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी वक्त केली आहे. तसेच या शिक्षकांचा गौरव करून शिक्षकांना अधिकाधिक चांगले कार्य करण्याकरिता प्रवृत्त करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top