रात्री पुरात वाहून गेलेल्या चिमुरडीने झाडाची फांदी पकडून ठेवली – जीवदान मिळाले!

0
1979

डहाणू दि. 5 ऑगस्ट: काल दिवसभर व रात्री पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला व ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे पुर आले. डहाणू तालुक्यात एका दिवसात सरासरी 46.5 सेमी पाऊस पडला. काल रात्री शेणसरी येथेही पुरपरिस्थिती निर्माण झाली. तेथील 5 वर्षीय चिमुरडी ममता विजय लिलका ही रात्री 2 च्या सुमारास पुराच्या भयंकर प्रवाहात वाहून गेली. मात्र सुदैवाने तिच्या हाती झाडाची फांदी लागली आणि ती तिने गच्च धरुन ठेवली. सकाळी 6 वाजता तिला शोधण्यात यश मिळाले. तिच्यावर सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी उपचार घेत असलेल्या मुलीची व तिच्या कुटूंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ममताची विचारपूस करताना तहसिलदार राहुल सारंग
Advertorial
Print Friendly, PDF & Email

comments