दिनांक 23 January 2018 वेळ 3:25 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पालघर, दि. 4 : पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी व रविवारी (5 व 6 ऑगस्ट) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी cropped-LOGO-4-Online.jpgवनविभागातर्फे वनभाज्या प्रदर्शन, भूमीअभिलेख विभागाद्वारे कांदळवन असलेल्या जमीनीच्या 7/12 वर कांदळवनाच्या नोंदी घेणे, शिक्षण विभागातर्फे एक दिवस शिक्षणासाठी या उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या मार्फत शाळा भेटी, मत्स्य विभागातर्फे निमखार्‍या पाण्यातील कोळंबी संवर्धकांना तटीय जलकृषी प्राधिकरणाच्या गाईड लाईनबद्दल जागरूता निर्माण करणे, कामगार उप आयुक्त कार्यालयातर्फे बांधकाम कामगार नोंदणी तसेच विविध योजनांतर्गत फायदे मिळवून देण्यासंदर्भात वसई, नालासोपारा येथील बांधकामाच्या साईटवर शिबीर घेणे, आर्थिक साक्षरता केंद्र पालघर तालुका शिबिर, राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्व शाखांमध्ये अटल पेंशन, जिवन ज्योती व जिवन सुरक्षा विमा योजना शिबिर, आदी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तर रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी घर व परिसर स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top