डहाणू: इंडियन बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

0
3382

दि. 14 जुलै: डहाणूतील इंडियन बॅन्केचे व्यवस्थापक प्रवीण कुमार (28) यांनी काल, सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिस तपास करीत आहेत.

प्रवीण कुमार हे हिमाचल प्रदेश येथील रहाणारे असून ते मसोली येथील अवंतिका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच रहात होते. सोमवारी सकाळी ते बॅंकेत न आल्याने व फोन उचलत नसल्याने बॅंकेचा शिपाई त्यांच्या घरी गेला. मात्र दरवाजा न उघडल्याने शिपायाने फ्लॅट मालकाला कळवले. मालकाकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. यानंतर लगेचच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करुन घेतले आहे. मृताचे नातेवाईक आज सायंकाळी मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी पोचले आहेत. पोलिस नाईक राजेंद्र लखन अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments