दिनांक 23 January 2018 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनसेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

मनसेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रतिनिधी :
बोईसर, दि. 31 : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याला उद्या (1 ऑगस्ट) तीन वर्ष पुर्ण होत आहेत. मात्र, आमच्या खर्‍या समस्या व विवंचना आज MANASE JILHADHIKARI DHADAKदेखील दुर्लक्षितच राहिलेल्या आहेत, अशी खंत व्यक्त करत जिल्ह्याला भेडसावणारे सर्वसामान्य प्रश्‍न घेऊन मनसेच्या पालघर जिल्हा शिष्टमंडळाने आज आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांच्या लेखी निवेदनासह जिल्ह्याचे आजचे अस्वस्थ व भयाण वास्तव दर्शवणारे उपहासात्मक चित्र भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे म्हणाले की, जिल्ह्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांविरोधात लढण्यासाठी ढिम्म प्रशासन, सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष नावाच्या त्रिकूट यंत्रणेत स्वारस्य दिसत नाही. या यंत्रणेला आम्हा सर्वसामान्य जनतेबाबत काडीचीही आस्था राहिली नसल्याने विकासाच्या मुद्द्यापासुन कोसो दुर असलेल्या जिल्ह्यात आपण राहतोय याबद्दल कुणाचंच दुमत नसावं, अशी संतापाची भावना संखे यांनी व्यक्त केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांना या तिन वर्षात जिल्ह्याला सतावत असलेल्या प्रश्‍नांची यादी देऊन, निदान पुढच्या वर्धापन दिनापर्यंत तरी आपल्या माध्यमातून हे सारे प्रश्‍न सुटतील आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावेल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. या विषयावर विस्तृतपणे बोलताना जिल्ह्याधिकारी प्रशांत नरनावरे म्हणाले की, आपण उपस्थित केलेले मुद्दे हे अतिशय रास्त असून जिल्ह्याचा विकास गतिमान पद्धतीने व्हावा याकरिता प्रशासन गंभीर आहे. तसेच जिल्ह्यातील रोजगाराच्या मुद्यावर झालेल्या मेळाव्याबाबत सर्वे करून येथील उद्योगांना 80 टक्के जागांवर स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेण्याच्या परिपत्रकाच्या अंमलबजावणी संदर्भात लवकरच निर्देश देणार असल्याचे सांगत जिल्ह्यात असलेल्या नैसर्गिक उपलब्धतेच्या अनुषंगाने येथे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. सागरी पर्यटनाच्या दृष्टीने नांदगाव चौपाटी विकसित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्याकरीता चालना देणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
याप्रसंगी मनसेचे उप जिल्हा अध्यक्ष अनंत दळवी, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत, विद्यार्थी सेना उप जिल्हा अध्यक्ष धीरज गावड, उप तालुका अध्यक्ष शिवाजी रेंबाळकर, विशाल जाधव, मंगेश बोरकर, विभाग अध्यक्ष मंगेश घरत, संदीप किणी, सागर शिंदे, माजी उप तालुका अध्यक्ष सुनील पाटील, रत्नदीप एडवणकर, विद्यार्थी सेनेचे विजय गांगुर्डे, धीरज पाटील, ललितेश संखे, जालीम तडवी, तन्मय संखे, भावेश तमोरे, विपुल गोराने, रत्नदीप शेवाळे, रोहन राणा, हेमंत घोडके यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top