दिनांक 18 December 2017 वेळ 3:05 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता असून त्याला चालना देणे आवश्यक! – डॉ. मोहन पटेल

आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता असून त्याला चालना देणे आवश्यक! – डॉ. मोहन पटेल

शिरीष कोकीळ/डहाणू
दि. 31 : आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता असून त्याला चालना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईचे माजी शेरीफ डॉ. मोहन पटेल यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणू व तलाMOHAN PATELसरी तालुक्यातील शालांत परिक्षांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करताना बोलत होते. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन प्लॅनेटरी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जे. जे. रावळ, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्टचे अध्यक्ष हरमिंदर सिंग, अपूर्व नानावटी, अरविंद शाह, तलासरीच्या परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत उपस्थित होते.
डॉ. मोहन पटेल यांच्या सुपा फार्म व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डहाणू व तलासरी तालुक्यातील प्रत्येक शाळांतून शालांत परिक्षेत पहिल्या 3 क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना रुपये 5 हजार, 3 हजार व 2 हजार पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. डॉ. मोहन पटेल यांनी रोटरी क्लबकडे या गुणगौरवासाठी 50 लाख रुपये निधी सुपूर्द केलेले असून या निधीच्या व्याजातून पारितोषिके दिली जातात. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक व्हावे, त्यांना पाठबळ मिळावे, पुढील आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखास बळ मिळावे म्हणून हा उपक्रम मागील 4 वर्षापासून राबविण्यात येतो.
यावेळी डॉ. बी. ए. राजपूत, ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रराज बोथरा, डॉ. जे. जे. रावल, डॉ. हरमिंदरसिंग पटेजा यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमास 50 शाळांतील पारितोषिक मिळविणारे विद्यार्थी, पालक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top