दिनांक 23 January 2018 वेळ 3:17 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » बोईसर : नांदगाव समुद्रकिनार्‍याच्या सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ!

बोईसर : नांदगाव समुद्रकिनार्‍याच्या सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ!

दि. 31 : ग्रामपंचायत नांदगाव तर्फे तारापूर व सुधा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आरती ड्रग्स समूहाच्या विशेष सहकार्याने सकसहार नांदगाव (नांदगाव बीच) NANDGAO SUSHOBHIKARANयेथे स्वच्छता व सुशोभीकरण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आरती ड्रग्स समूहाचे संचालक उदय पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील, नवनिर्वाचित सरपंच शर्मिला राऊत, उपसरपंच सुमित ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, तृप्ती गावड व राजेश्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. शुक्रवारी (दिनांक 28) पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास शाखाप्रमुख धर्मेंद्र पाटील, उप शाखा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा युवाधिकारी पंकज ठाकूर, उप युवाधिकारी पंकज पाटील, माजी सरपंच अजित राणे, मिलिंद ठाकूर, सतिश मोरे, हितेश ठाकूर, जेष्ठ शिवसैनिक सुनील ठाकूर, आशिष ठाकूर, हितेश राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top