पारनाका ते डहाणू फोर्ट रस्ता, कॉन्क्रीटवर डांबरीकरणास लोकांचा विरोध

0
2
Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

दि. 29: डहाणू शहरातील 1 कोटी 10 लाख रुपये खर्चून मजबूत स्थितीतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. डहाणू शहरातील दलितवस्ती सुधारणा अंतर्गत एक रस्ता समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर अनावश्यक असल्याने रद्द केला असला तरी तशी तत्परता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दाखविण्यात आलेली नाही.

संबंधित बातमी वाचा: डहाणू शहरात कॉंक्रीट रस्त्यांवर 2 कोटींचा डांबर; कंत्राटदारांचे संगनमत

ह्या रस्त्याबाबतची रंजक माहिती:
रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा
तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची
निधी जिल्हा विकास योजनेचा
रस्ता बांधणार डहाणू नगरपरिषद
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिचा रस्ता, हे खाते सक्षम असताना, डहाणू नगरपरिषद का करते? ह्या प्रश्नाचे उत्तर लोकांना हवे आहे!

पारनाका ते डहाणू फोर्ट दरम्यानचा कॉन्क्रीट रस्ता आजही मजबूत स्थितीत आहे. असा रस्ता डहाणू नगरपरिषदेला आजतागायत बांधता आला नाही. आता जिल्हा विकास निधीवर डल्ला मारुन ह्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत असले तरी कॉन्क्रीटवर डांबरीकरण टिकणार नाही असे तज्ञांचे मत आहे. एकदा डांबरीकरण केलेला रस्ता, उखडल्यानंतर तो पुन्हा दुरुस्ती केला जाईल याची लोकांना खात्री नाही. त्यापेक्षा आहे त्याच रस्त्याचे रुंदीकरणापुरते डांबरीकरण करा, अशी लोकांची मागणी आहे.

सध्याचे काम निकृष्ट दर्जाचे:- सध्या रस्त्याच्या साईडपट्टीवर आणि अर्ध्या रस्त्यावर दगड पसरलेले आहेत. हे दगड पसरताना नाममात्र डांबराचा वापर केल्यामुळे ते सहजच निघतात. त्यावर हॉट मिक्स पसरुन रस्त्याची बिले काढण्यात कंत्राटदाराला स्वारस्य आहे.

सहज पायाने बाजूला होणारे दगड
Print Friendly, PDF & Email

comments