रात्रपाळी आटोपून घरी परतणाऱ्या परिचारिकेचा अपघाती मृत्यू

0
547

दि. 28: भरधाव पीकअप वाहनाने मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात रात्रपाळीची कर्तव्यपुर्ती करुन घरी परतणाऱ्या परिचारिका सौ. प्रिया प्रभाकर संखे (50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सौ. प्रिया ह्या ऐने प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. आज सकाळी ड्युटी संपवून डहाणू येथील घरी परतत असताना, वाहन न मिळाल्याने त्यांनी डहाणूकडे येणाऱ्या यशवंत गोरखना यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्या प्रवास करीत असलेल्या मोटरसायकलला सकाळी 10 च्या सुमारास आशागड येथील नदीजवळ पिकअपने जोरदार धडक दिल्यानंतर दोघेही हवेत उडून रस्त्याच्या बाहेर फेकले गेले. त्यामध्ये यशवंत जागीच ठार झाले व प्रिया यांनी रुग्णालयात नेताना वाटेतच श्वास सोडला.

विशेष म्हणजे, ज्या पिकअपने धडक दिली ते वाहन रेतीचा व्यवसाय करणारे होते व वाहनावर कुठेही नंबर लिहिलेला नाही. कदाचित फक्त पुढे नंबराच्या पाटीचा अंश दिसतो. यावरुन तिथे नंबर लिहिलेला असू शकतो. मात्र मागच्या व दोन्ही बाजूनी नंबराचे नामोनिशाण दिसत नाही. यावरुन रेतीच्या गाड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे अधोरेखित होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments