डहाणू: त्या +Ve परिचारिकेचा एकाच दिवसातला दुसरा रिपोर्ट -Ve

0
404

डहाणू दि. 24: डहाणू तालुक्यातील वाकी येथील कोरोना +Ve स्टाफ नर्सचा एकाच दिवसातील दुसरा तपासणी अहवाल -Ve आला आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलेची दक्षता स्वतःला त्रासदायक ठरत असली तरी, तीने खऱ्या अर्थाने कोरोना वॉरिअरची भूमिका निभावली आहे. दैनिक राजतंत्रशी ह्या कोरोना वॉरिअरने संपर्क साधून रुग्णालयातून लवकर बाहेर यायची इच्छा व्यक्त केली आहे.

ही 39 वर्षीय महिला मुंबई महापालिकेच्या बोरीवली येथील रुग्णालयात परिचारिका आहे. ती डहाणू येथून रोज कर्तव्य बजावण्यासाठी जात असे. तीचा पती मनोर नाक्यापर्यंत तीला स्वतःच्या वाहनाने सोडत असे व तेथून ती एस टी बसने बोरीवलीपर्यंतचा प्रवास करीत असे व तसाच परतीचा प्रवास करीत असे. रोजच्या दगदगीने ह्या महिलेला थकवा जाणवू लागला व एक दिवस मळमळ व ओकाऱ्या झाल्या. त्यासाठी औषधोपचार घेताना, ती मुंबईत सेवा बजावत असल्याने कोरोना तपासणी करण्याचा सल्ला मिळाला. तीने 18 मे रोजी स्वतःचे 4 हजार रुपये खर्चून घशाच्या नमुन्याची तपासणी केली. दुपारी 1 वाजता नमुना घेऊन 2 तासांत मिळालेला अहवाल होता कोरोना पॉझिटीव्हचा. लगेचच महिलेला प्रथम डहाणू उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता घशाचे नमुने घेण्यात आले. तीचे सासू, सासरे, पती, मुलगी व निकटवर्ती असे 6 जणांचे घशाचे नमुने घेण्यात आले. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आता सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असले तरी, सत्व परिक्षा सुरु आहे. ह्या महिलेला सध्या टीमा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. माझी लवकर दुसरी चाचणी घ्यावी आणि कोरोनाचा आजार नसेल तर घरी जाऊ द्यावे अशी महिलेची अपेक्षा आहे. अजून तीची दुसरी चाचणी झालेली नाही.

ही महिला खरीखूरी कोरोना वॉरिअर आहे. तीला तपासणी करताना प्राधान्यक्रम मिळाला पाहिजे. तपासणी अहवाल शीघ्र गतीने प्राप्त करुन घेणे गरजेचे आहे. आणि आरोग्यसेवकांना कुठलेही अप्रिय अनुभव येणार नाहीत याची प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे!
संजीव जोशी (संपादक दैनिक राजतंत्र)

Print Friendly, PDF & Email

comments