मुंबईतून कोरोना +ve महिला विक्रमगड मध्ये आली; विक्रमगडची अडचण वाढवली!

0
5

पालघर, दि. 21: मुळची विक्रमगड येथील डॉक्टर असलेली महिला 2 दिवसांपूर्वी बोरीवली येथून माहेरी आली आणि विक्रमगड करांची अडचण वाढवली आहे. ही महिला कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे विक्रमगडकरांसाठी धोका उद्भवला आहे. विक्रमगडची बाजरपेठ संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

ह्या महिलेचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते व पतीपत्नी बोरीवली येथे रहात होते. तेथे ते होम क्वारन्टाईन होते व त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी हे दांपत्य विक्रमगड येथे आले व मुलीच्या आई वडीलांकडे राहिले. दरम्यान, महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य पथक त्यांच्या बोरीवली येथील घरी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बोरीवली जिल्हाधिकारी यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, दांपत्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पतीची रवानगी क्वारन्टाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. ह्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्यांना क्वारन्टाईन सेंटर मध्ये दाखल करुन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV(तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

Print Friendly, PDF & Email

comments