डहाणू शहरात कॉंक्रीट रस्त्यांवर 2 कोटींचा डांबर; कंत्राटदारांचे संगनमत

0
198

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV(तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

दि. 20 मे: डहाणू नगरपरिषदेने सुस्थितीत असलेल्या कॉंक्रीट रस्त्यांवर तब्बल 2 कोटी रुपये खर्चून डांबरीकरणाची उधळपट्टी चालवली आहे. ही सर्व कामे 3 ठेकेदारांनी मॅनेज करुन सरासरी 10 टक्के अधिक दराने मिळवली असून त्यामुळे नगरपालिकेला 20 लाख रुपयांचा अधिकचा चूना लागला आहे. एकीकडे राज्य सरकारने अनावश्यक कामे रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या असताना, घाईघाईत ही कामे उरकण्याचा सपाटा लावला आहे. डहाणूचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जाताजाता सर्व कामांचे कार्यादेश दिले आहेत.

कुठली आहेत कामे?

  1. पेट्रोल पंप ते इंटीग्रेट रस्ता (40 लाख 47 हजार)
  2. जव्हार रोड ते कैनाड नाका रस्ता (58 लाख)
  3. पारनाका ते डहाणू न्यायालय रस्ता (50 लाख)
  4. डहाणू न्यायालय ते डहाणू फोर्ट रस्ता (58 लाख 36 हजार)
हा आहे कैनाड रस्ता. 675 मीटर लांबीचा हा कॉंक्रीट रस्ता 58 लाख रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात येत आहे.

ही सर्व चारही कामे प्रकाश कर्णावट, भाविन शाह व दिनेश पारेख ह्या 3 कंत्राटदारांनी संगनमत करुन 10 टक्के अधिक दराने मिळवल्याचे समोर आले आहे. अनुक्रमे 1 व 2 ची 1 कोटी रुपयांची कामे प्रकाश कर्णावट ला मिळाली आहेत. त्यासाठी भाविन शाह व दिनेश पारेख ह्या कंत्राटदारांनी डमी निविदा भरल्या. अनुक्रमे 3 व 4 ची कामे दिनेश पारेख यांना मिळाली असून त्यासाठी प्रकाश कर्णावट व भाविन शाह यांनी डमी निविदा भरल्या. भाविन शाह हा कंत्राटदार दिनेश पारेख ह्यांचा भाचा व भागीदार आहे.

चारही कामे जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेली आहेत. डहाणू ते फोर्ट रस्ता अतिशय मजबूत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तसाच ठेऊन रुंदीकरण केले होते. आता डहाणू नगरपरिषदेने मात्र ही निशाणी डांबर फासून मिटवून टाकणार आहे. इंट्रीग्रेट व कैनाड रस्ता, हे दोन्ही रस्ते देखील सुस्थितीत असून केवळ कोट्यावधी रुपयांची उड्डाणे घेण्यासाठीच हाती घेतल्याचे मानले जाते.

डहाणू नगरपरिषद: मुख्याधिकारी द्वासेंची शेवटचा हात साफ करायची संधी हुकली

डहाणूचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची उचलबांगडी

हे देखील वाचा : ….. डॉक्टरकी विसरुन अधिकार डोक्यात गेलेले डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे

हे देखील वाचा : ….. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे
डहाणूचा भाजीपाला ठप्प होण्याच्या मार्गावर

डहाणू नगरपरिषद: डॉ. द्वासेंची बदली झाली, खूर्ची घरी नेली!

हे आहे पारनाका ते फोर्ट कॉंक्रीट रस्त्याचे डांबरीकरण. साईडपट्टी करताना खोदकाम करुन तीच माती वापरली जाते. कागदावर मात्र मुरुमाचे पैसे मोजले जात असतील.
Print Friendly, PDF & Email

comments