आज रोजी पालघर जिल्ह्यात 37 कोरोना पॉझिटीव्ह

0
704

पालघर, दि. 11 एप्रिल: जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. मृतांचा आकडा 4 वर स्थीर ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. एकूण 49 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यातील 33 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असून 16 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. पालघर तालुक्यातील 2 पॉझिटीव्ह, व वसई ग्रामीण क्षेत्रातील 3 पॉझिटीव्ह वगळता, उर्वरीत 32 कोरोना पॉझिटीव्ह हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.

228 तपासणी अहवाल निगेटिव्ह : एकूण 421 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 265 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 228 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 156 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

सध्या 49 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1 (रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 13 (अहवाल प्राप्त नाही); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 2 (अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2 (अहवाल प्राप्त नाही); रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 3; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 7; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1:

  • 81 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 49 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 421 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 228 नमुने निगेटिव्ह.
  • 156 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 4 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

डहाणूरोड भाजी मार्केट: सोशल डिस्टन्सींगची ऐसीतैसी

डॉक्टरकी विसरुन अधिकार डोक्यात गेलेले डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे

Print Friendly, PDF & Email

comments