जव्हार, दि. 8: जव्हार शहरात मागील आठवड्यात भिवंडी येथून आलेल्या व क्वारन्टाईन करण्यात आलेल्या 8 व्यक्तींच्या घशांच्या नमुन्याचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने जव्हारकरांना दिलासा मिळाला आहे. अहवालाकडे जव्हारकरांचे लक्ष लागून होते.
क्वारन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांविषयी शहरात विविध अफवा पसरल्या होत्या. त्यांना हनुमान पॉईंट येथील शासकीय वसतिगृहाच्या ईमारतीत देखरेखीखाली क्वारन्टाईन केले असता, परिसरातील लोकांनी आक्षेप घेऊन संबंधित व्यक्तींना इतरत्र हलविण्याची मागणी देखील केली होती. आता अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना घरी सोडण्यात आले असून होम क्वारन्टाईन केल्याची माहिती जव्हारचे प्रांताधिकारी प्रजीत नायर यांनी दिली आहे. या इसमांना १४ दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA