दिनांक 09 April 2020 वेळ 3:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)

पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)

पालघर, दिनांक 25.03.2020: पालघर जिल्ह्यामध्ये परदेशात प्रवास केलेल्या 553 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यामध्ये 21 जण हे 60 वर्षे पेक्षा जास्त वयाचे आहेत. देखरेखीखालील प्रवाश्यांपैकी 131 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.
20 प्रवाश्यांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यातील 18 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल निगेटिव्ह आले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला आहे.
 • डहाणू: तालुक्यात 35 जण देखरेखीखाली असून त्यातील 2 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 10 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
 • पालघर: तालुक्यात 97 जण देखरेखीखाली असून त्यातील 7 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 32 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 10 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, 8 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. 2 रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे.
 • वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 1 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
 • जव्हार: तालुक्यात 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. • विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली असून त्यातील 1 जणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
• मोखाडा: एकही व्यक्ती देखरेखीखाली नाही.
 • वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्यात 390 जण देखरेखीखाली असून त्यातील 12 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 73 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 5 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 1 अहवाल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top