धर्माधिकारी प्रतिष्ठानची बोईसरमध्ये स्वच्छता मोहिम

0
552

36 किलोमीटर रस्ते व सार्वजनिक स्थळे केली स्वच्छ

वार्ताहर/बोईसर, दि. 1 : गेल्या काही वर्षांपासुन विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे आज बोईसर येथे व्यापक स्वरुपात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी हजारो श्री सदस्यांनी सुमारे 36 किलोमीटर अंतराचे रस्ते व सार्वजनिक स्थळांचा परिसर स्वच्छ केला.

डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत 2 हजार 363 श्री सदस्य सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यासह दमण या केंद्रशासित प्रदेशातून आलेल्या सदस्यांचा यात समावेश होता. यावेळी शहरातील सुमारे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते तसेच पोलीस स्टेशन, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालय व सरकारी कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. हे अभियान राबवताना ग्रामपंचायतींवर जादा बोजा न देता सरकारी व खाजगी वाहन घेऊन परिसरातील 21 टन ओला कचरा व 36 टन सुका कचरा डम्पिंगपर्यंत पोहचविण्यत आला.

धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सामाजिक सेवाभावी संस्था असुन प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता माहिमेसह बालसंस्कार मार्गदर्शन, स्त्री पुरुष आध्यत्मिक समाज प्रबोधन, सामाजिक व पर्यावरण संतुलन बनवण्याच्या हेतून जनजागृती, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य शिबीरे, प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मूलन कार्यक्रम, सामाजिक घटकांवर मार्गदर्शन आदी उपक्रम राबण्यात येत असतात.

Print Friendly, PDF & Email

comments