दिनांक 09 April 2020 वेळ 3:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : टाकून दिलेल्या नकोशीचा मृत्यू; अज्ञात माता पिता विरोधात गुन्हा दाखल

वाडा : टाकून दिलेल्या नकोशीचा मृत्यू; अज्ञात माता पिता विरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : वाडा तालुक्यातील तिळसा येथे तीन दिवसाची नवजात बालिका सापडली असून दुर्दैवाने तिचा मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून निर्दयी माता पितांविरोधात वाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी तिळसा येथील नदी किनारी असलेल्या नारायण डुकले यांच्या शेतात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एक तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी टाकून दिल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना खबर दिली असता, या अर्भकास प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र आधीच नकोशा झालेल्या या बालिकेचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात माता पिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अलका करडे करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top