दिनांक 18 January 2020 वेळ 12:31 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिम जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आदिम जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 16 : आदिम जमातीच्या संरक्षण तथा विकास कार्यक्रमाअंतर्गत, आदिम जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराकरिता (1 कॉम्पुटर व 1 झेरॉक्स मशिन संच पुरविणे) अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. यासाठी जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील आदिम जमातीच्या (कातकरी) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी खाली नमुद कागदपत्रांसह जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 28 जानेवारी पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. तसेच यापुर्वी सादर करण्यात आलेले अर्ज बाद करण्यात आलेले असल्याने लाभार्थ्यांनी नवीन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशील :
1) लाभार्थी हा आदिम जमातीचा असावा. त्याच्याकडे उपविभागीय अधिकार्‍यांनी दिलेला स्वत:चा जातीचा दाखला असावा.
2) लाभार्थी पदवी तसेच एमएससीआयटी/सीसीसी उत्तीर्ण असावा. उच्च शिक्षित बीसीए/एमसीए असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3) लाभार्थ्याने या कार्यालयाकडुन यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
4) लाभार्थ्यांकडे 2018-19 या वर्षाचा सक्षम अधिकार्‍याने दिलेला उत्पन्नाचा दाखला असावा.
5) लाभार्थ्यांचा रहिवाशी दाखला असावा.
6) अर्जदाराच्या नावे ग्रामसभेचा ठराव असावा.
7) अर्जदाराच्या नावे यापुर्वी या योजनेचा लाभ दिला नसल्याचा ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला असावा.
8) लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्डच्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या.
9) योजनेची रक्कम डीबीटीने देण्यात येणार असल्याने लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची छायांकीत प्रत जोडावी.
10) अर्जासोबत अलिकडच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडण्यात यावे.
11) वरील अटी व शर्तींची पुर्तता करणार्‍या विधवा, परित्यक्ता, दिव्यांग कातकरी लाभार्थ्यांना योजना मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
12) अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार यांच्याकडे राखुन ठेवण्यात आले आहेत.
13) विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
14) उपरोक्त सर्व कागदपत्रांवर लाभार्थ्यांनी स्वाक्षरी करुन ते अर्जासोबत सादर करावेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top