दिनांक 18 January 2020 वेळ 11:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप!

पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप!

सालवडच्या ओम साई मंडळाचा उपक्रम

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : शिर्डी पदयात्रेदरम्यान वाटेत येणार्‍या जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा अनोखा उपक्रम बोईसरमधील सालवड गावातील ओम साई मित्र मंडळ राबवत आहे.

ओम साई मित्र मंडळातर्फे दरवर्षी 12 जानेवारी रोजी शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या पदयात्रेदरम्यान वाटेत येणार्‍या जिल्हा परिषद शाळा तसेच आदिवासी बांधवांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात येते. यंदा मंडळातर्फे विक्रमगड तालुक्यातील यशवंतनगर जिल्हा परिषद शाळेतील 80 गरीब व गरजु आदिवासी विद्यार्थांना शालेयपयोगी साहित्य तसेच ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष मनोज ठाकुर व इतर साईभक्त उपस्थित होते. दरम्यान, यावर्षी पदयात्रेत 300 पेक्षा अधिक साई भक्त सहभागी झाले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top