दिनांक 06 April 2020 वेळ 3:59 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

भवानीवाडी शाळेचे योगदान, जनावरांना मिळणार संजीवनी

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 16 : तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या केवनाळापैकी भवानीचीवाडी जिल्हा परिषद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने वनराई बंधारा बांधून एक आदर्श निर्माण केला आहे.

समुद्र सपाटीपासून 2 हजारपेक्षाही अधिक उंचीवर केवनाळा पैकी भवानीचीवाडी हे गाव वसलेले आहे. अतिदुर्गम आणि कुचकामी रस्ता असलेले म्हणजे जवळजवळ पथहिन असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनी हा पथदर्शी उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून या कामी हातावर पोट भरणार्‍या ग्रामस्थांनीही रोजंदारी मोडीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत श्रमदान केले आहे. त्यामुळे किमान येथील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

मोखाडा तालुक्यात सरासरी पेक्षाही प्रसंगी अधिक पाऊस पडत असतो. परंतु पावसाचे पाणी साठवण्यासाठी तालुक्यात कुठेही साधनसुचिता नसल्याने माणसांबरोबरच जनावरांचेही प्रचंड हाल होत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे वनराई बंधारे ही काळाची गरज बनली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top