दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एलईडी स्क्रीनद्वारे स्वच्छता जनजागृती

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एलईडी स्क्रीनद्वारे स्वच्छता जनजागृती

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 15 : राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी एलईडी स्क्रीन असलेली व्हॅन पाठविण्यात आली आहे. या स्वच्छता व्हॅनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फीत कापून उद्घाटन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) टी. ओ. चव्हाण तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील जनतेमध्ये विविध माध्यामातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या व्हॅनचा वापर जनजागृतीसाठी करण्याचा मानस पाणी व स्वच्छता विभागाचा आहे. हागणदारी मुक्त गावाचे विविध जनजागृतीपर संदेश, घन कचर्‍याचे व्यवस्थापन सांगणारे विविध संदेश, कचर्‍याचे वर्गीकरण कसे करावे, आदी बाबींसह संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेविषयी माहिती या व्हॅनमधील एलईडी स्क्रिनद्वारे दिली जाणार आहे. या एलईडी व्हॅन स्क्रीनच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतेविषयी भारूड, गवळण, नाटिका, लघूपट व गाणी दाखवून वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शालेय शौचालये, अंगणवाडी शौचालये, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, शुद्ध पाणी, पाणी गुणवत्ता, ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता समितीचे बळकटीकरण करणे, थर्माकोल व प्लास्टिक बंदी, मासिक पाळी व्यवस्थापन आदी घटकांबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील एकूण 150 गावांमध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आठवडी बाजार, यात्रा, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी जावून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top