दिनांक 20 February 2020 वेळ 10:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर : माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहनाचे उद्घाटन

पालघर : माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहनाचे उद्घाटन

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अन्नपूर्णा वाहनांचे आज पालघर येथील चार बचत गटांना वाटप करण्यात आले. छत्तीसगडच्या खासदार आनुसुईया उईके, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा व जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन व वाटप करण्यात आले.

माँ साहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहन हे संपुर्ण डिजिटल वाहन असल्याकारणाने पदार्थांची विक्री करण्यापासुन हिशोब ठेवण्यापर्यंतचे व्यवहार डिजिटल असणार आहेत. त्यानुसार संबंधित महिला बचत गटांना गेले महिनाभर सदर प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वाहनांमधून सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचं जेवण व संध्याकाळचा चहा अशा प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या प्रयत्नातून या वाहनांचे वाटप करण्यात आले असुन यामुळे महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

याप्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ठाकरे, शिवसेनेच्या पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उपजिल्हा महिला संघटक श्वेता देसले, पालघर पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे आदींसह बचतगटांतील महिला उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top