दिनांक 30 May 2020 वेळ 7:24 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » निवृतीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरी

निवृतीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरी

प्रतिनिधी/वाडा, दि.14 : संत निवृत्तीनाथ यात्रा सोहळा येत्या 21 जानेवारीला त्र्यंबकेश्वर येथे आहे. या निमित्ताने तालुक्यातील विविध परिसरातुन निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करत दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या (नाशिक) दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी दिंड्यांतील वारकर्‍यांच्या स्वागत व निरोपासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

वाडा तालुक्यातील दिनकरपाडा (कोंढले विभाग) पळसपाडा, मेट, देवघर, गुंज, खानिवली, नांदनी, अबिटघर, तिळसा, झिडके, खरीवली, लोहपे, अंभरभुई आदींसह पंधराहुन अधिक गावातून दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे निघाल्या असुन चार हजारांच्या आसपास वारकरी यात सहभागी झाले आहेत. तर सर्वच रस्ते दिंड्यांनी फुलून गेल्याने तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले आहे. तसेच सर्वच रस्ते दिंड्यांनी फुलून गेले आहेत.

सकाळी काकड आरतीपासुन रात्री मुक्कामी कीर्तन, प्रवचन, जागर करत दिवसरात्र नामस्मरण करुन या दिंड्या मंगळवार (ता.21) पर्यंत त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील. या वर्षी तरुण- तरुणींचा दिंड्यांमध्ये वाढता सहभाग हा भारतीय संस्कृती जोपासण्याचा चांगला संकेत असुन आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन व रक्षण करणे ही आजच्या तरुणांची जबाबदारी असल्याचे मत यावेळी दिंडी चालक बळीराम भेरे व भास्कर दुबेले यांनी व्यक्त केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top