दिनांक 30 May 2020 वेळ 8:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी 151 सुर्यनमस्कार

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी 151 सुर्यनमस्कार

डहाणूच्या महिलांची लिम्का बुकमध्ये नोंद

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 13 : दिनांक 12 जानेवारी रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिना निमित्ताने राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील पतंजली योग समितीच्या योग वर्गातील 11 महिलांनी या दिवशी 151 सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केला आहे. चेतना योग या मुंबईतील प्रतिष्ठित संस्थेने मुंबईतील अंधेरी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात एकूण 793 महिला व पुरुषांनी सहभाग घेऊन केवळ 65 मिनिटात 151 सूर्यनमस्कार पूर्ण केल्यानंतर त्याची नोंद जागतिक पातळीवरील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला पुरुषांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

डहाणूतील महिलांसाठी पतंजलीच्या योग शिक्षिका पूजा चौधरी व दर्शना वोरा यांनी विशेष परिश्रम घेतले. नोकरी न करणार्‍या महिलांना घरकाम सांभाळून समाजात वावरणे किंवा बाहेर पडणे या गोष्टी बहुदा शक्य होत नाहीत. परंतु योग साधनेतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना जागतिक दर्जाच्या लिम्का बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल खास कुतूहल वाटत असून डहाणूतील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पतंजली योग समितीच्या पदाधिकार्‍यांसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. अशा कार्यक्रमातून समाजामध्ये योग व व्यायामाविषयीची आवड निर्माण होऊन निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाला महत्व प्राप्त होईल, असा विश्वास डहाणू पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी उत्तम सहाणे यांनी व्यक्त केला आहे.

डहाणूतील या सर्व महिला 36 ते 60 वर्षे या वयोगटातील असून देखील त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: पूजा चौधरी, दर्शना वोरा, मनीषा राणे, रत्नमाला कोळी, अर्चना ओक, आशा मोरे, सविता खडांगळे, लिना चौधरी, माधुरी पाटील, चंद्रिका तांडेल, निशा बनिया.

comments

About Rajtantra

Scroll To Top