दिनांक 30 May 2020 वेळ 8:09 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अज्ञात व्यक्तीने शिवसैनिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या

अज्ञात व्यक्तीने शिवसैनिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या

  • वाड्यात वातावरण तप्त; शिवसैनिक संतापले
  • राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील चिंचघर या गावात गेल्या चार दिवसात शिवसैनिकांच्या तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निकालातून कुडूस गट, कुडूस गण व चिंचघर गण या तिन्ही ठिकाणी शिवसेनेने जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. असे असताना चिंचघर येथील शिवसैनिक दामोदर लाड यांच्या इनोव्हा कारची 10 जानेवारी रोजी, भुषण पाटील यांच्या स्कॉर्पिओ जीपची 11 जानेवारी रोजी, तर शिक्षक सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष मनेश पाटील यांच्या क्रेटा गाडीची (क्रमांक एम.एच. 48/बी.आर. 4050) मागची काच आज रविवारी पहाटेच्या सुमारास भला मोठा दगड टाकून फोडण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वादातूनच या काचा फोडल्याचा आरोप शिवसैनिक करीत आहेत.

दरम्यान, या तिन्ही घटना एकाच गावात घडल्याने कुडूस परिसरातील शिवसैनिक प्रचंड संतापले असून जे कोणी हे कृत्य करीत असतील त्यांनी समोर येऊन करावे, असा उघड उघड दम भरला आहे. तर या घटनांचा तपास करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या तालुका महिला आघाडीच्या प्रमुख रेश्मा पाटील यांनी केली आहे.

या घटनेबाबत कुडूस पोलीस दूरक्षेत्रात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस हवालदार किशोर माळी करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top