दिनांक 26 May 2020 वेळ 5:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सफाळ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सानप यांचे हृदयविकाराने निधन

सफाळ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सानप यांचे हृदयविकाराने निधन

प्रतिनिधी/डहाणू, दि. 5 : पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सफाळे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सानप यांचे निधन झाले. काल, शनिवारी (दि. 5) ही हृदयद्रावक घटना घडली.

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील माकुणसार भागात क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी केळवे विरुद्ध सफाळे पोलीस स्टेशनमध्ये क्रिकेट सामना झाला. या सामन्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक सानप यांनी उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर ते मैदानाबाहेर येताच त्यांना छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना सफाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक त्रास सुरु झाल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ वसईला नेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना वसईतील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

अत्यंत शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जाणारे संदीप सानप (वय 38) हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने पालघर पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 2019 पासून सानप पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top