वाडा : अक्षय लॉजवर पोलिसांचा छापा; 7 युगुलांवर कारवाई

0
139

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : तालुक्यातील शिरीषपाडा येथील अक्षय लॉजवर अनैतिक व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याने वाडा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अक्षय लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असल्याचा संशय पोलिसांना होता. सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर वाडा पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) या लॉजवर धाड टाकली असता लॉजच्या परिसरात 7 युगुल अश्लील कृत्य करत असल्याचे आढळून आल्याने सर्वांना ताब्यात घेऊन वाडा पोलीस स्टेशनला आणण्यात आले. चौकशीअंती सर्व जोडप्यांवर मुंबई पोलिस अधिनियम कलम 110, 112, 117 प्रमाणे कारवाई करुन व नोटीस बजावून सोमवारी (दि. 30) कोर्टात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, पोलीस उपनिरीक्षक अलका करडे, पोलीस काँस्टेबल सतीश शेलवले व महिला पोलीस नाईक वंदना राव यांच्या पथकाने कारवाई केली.

Print Friendly, PDF & Email

comments