पालघर : विद्यार्थ्यांनी जागविला गडकिल्ल्यांचा इतिहास

0
430
????????????????????????????????????

दांडेकर महाविद्यालयात किल्ले बांधणे स्पर्धा संपन्न!

????????????????????????????????????

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 19 : विद्यार्थ्यांमध्ये आपला गौरवशाली इतिहास व ऐतिहासिक वारसा जनत करण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी या हेतूने प्रथमच येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सद्यकालीन गडांची अवस्था पाहता या गडांच्या संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजावा हा ही हेतू स्पर्धेमागे होता.

या स्पर्धेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकुण 62 संघांनी सहभाग नोंदवून उत्तमरित्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. यामध्ये केवळ महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख गडकिल्ल्यांच्याच नव्हे तर पालघर परिसरातील कोहोज, यशवंत (शिरगाव), अर्नाळा, काळदूर्ग, माहीम, टेहळणी बुरूज (केळवे) या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या. यासोबत रायगड, पन्हाळागड, विशालगड, सिंधुदूर्ग, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड, दौलताबाद किल्ला, मुरूड जंजिरा व ग्वालियर किल्ल्यांचा देखील समावेश होता. सध्या अनेक किल्ल्यांवर मद्यपी लोक मद्यपान करतात तसेच पर्यटक कचरा तेथेच सोडून जातात हा विचार देखील विद्यार्थ्यांनी पूर्वीचे किल्ले आणि आताचे किल्ले, अशी प्रतिकृती तयार करून दाखविली. साधारणपणे 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये अभ्यासपूर्ण सहभागी होऊन या नवीन पिढीमध्ये देखील आपल्या संस्कृती व इतिहासाबद्दल अभिमान व आत्मियता आहे हे दाखवून दिले. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, आपला इतिहास व प्रामुख्याने आपल्या मातीशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

या स्पर्धेच्या निमित्ताने सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, कोशाध्यक्ष हितेंद्र शहा तसेच इतर पदाधिकार्‍यांनी किल्ल्यांच्या प्रदर्शन स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. महेश देशमुख, सौ. प्रिती फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी प्रा. विवेक कुडू, सौ. श्रीया दांडेकर, क्रिडा प्रशिक्षक तसेच गिर्यारोहक किरण थोरात यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी तुषार पाटील, यतिश सातवी, हिना शेख, अनुजा पाटील, हिमांशु पाटील, प्रकाश चाबके, मिनव पाटील, हर्षल चौधरी, तेजस चौधरी, भुषण भोईर, निशांत पाटील, मनिष पाटील, संदेश मेरे, नितिन पवार, उमेश मोरे तसेच शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments