दिनांक 18 January 2020 वेळ 11:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विरारमध्ये 7 बांगलादेशींना अटक

विरारमध्ये 7 बांगलादेशींना अटक

पालघर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 13 : बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास असलेल्या 7 बांगलादेशी नागरीकांना विरार येथून अटक करण्यात आली असुन पालघर दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली.

विरारमधील तिरुपती नगर येथील मच्छीमार्केट चिकन शॉप भागात काही बांगलादेशी नागरीक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, 11 डिसेंबर रोजी 10 वाजता सदर भागात दहशतवाद विरोधी पथकाने शोधमोहिम राबवून 7 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेतले आहे. शाबुद्यीन अब्दुल मोतीन भुईया (वय 36), मोहम्मद इस्लाम अब्दुल लतीफ शेख (वय 22), शाहआलम नुरईसलम शेख (वय 22), मोहम्मद अमिर मन्नु शेख (वय 19), सैदुल ईसलाम कमलमिया शेख (वय 20), रोहुलअमीन जुलमत अली (वय 29) व शाहबुद्यीन मुजबीर हक, अशी सदर बांगलादेशींची नावे आहेत.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या बांगलादेशींवर विरार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6(अ) सह विदेशी नागरीक अधिनियम कलम 14 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन 12 डिसेंबर रोजी सर्वांना अटक करण्यात आली आहे.


comments

About Rajtantra

Scroll To Top