दैनिक राजतंत्रचे ” सोशल रिपोर्टर ” व्हा!

0
416

दैनिक राजतंत्र तर्फे आयोजित सोशल रिपोर्टींग कार्यशाळेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. (ज्यांनी आधीच पत्रकारितेची पदविका / पदवी घेतली आहे त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नाही)
दैनिक राजतंत्र तर्फे आयोजित सोशल रिपोर्टींग कार्यशाळेसंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या:- एक दिवसीय (45 मिनिटांच्या 9 तासिका) सोशल रिपोर्टींग कार्यशाळा
तुमच्या बातम्या www.rajtantra.com व दैनिक राजतंत्रच्या Android App वर तुमच्या नावाने प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची Link तुम्हाला तुमच्या Email किंवा WhatsApp वर मिळेल. ती Link हव्या त्या Social Media वर Share करुन तुम्ही एक विश्वसनीय स्त्रोत बना. विश्वासार्ह बातम्या प्रसारित करुन विश्वसनीय सोशल रिपोर्टर बना. निवडक बातम्यांना दैनिक राजतंत्रमध्ये प्रसिद्धी मिळेल.

त्याशिवाय आपण काय करणार आहोत?
सोशल मिडीया चा वापर करणाऱ्या नागरिकांना पत्रकारितेची मुलतत्वे व आचारसंहिता समजावून सांगितली जाईल. त्यानंतर सोशल / मानद पत्रकारांच्या टिम बनवून विविध शासकीय कार्यालयांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.  लोकशाही दिन खरोखरच लोकशाही पद्धतीने होतो का? सेवा हक्काप्रमाणे लोकांची कामे मुदतीत होतात का? भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी प्रयत्न होतात का? अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतात का? शासकीय रुग्णालयात डॉक्टर असतात का? डॉक्टर असले तर औषधे असतात का? जबाबदार अधिकारी मुख्यालयात रहातात का? अशा कितीतरी गोष्टींकडे सक्षम नागरिक म्हणून आपल्याला लक्ष देता येईल.

आपल्या गावाच्या ग्रामसभेला किंवा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा त्या गावातील किंवा शहरातील नागरिकांना कायदेशीर अधिकार असतो. त्या सभेचे वृत्तांकन करून आपण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारावर लक्ष ठेवू शकतो.

Print Friendly, PDF & Email

comments