दिनांक 18 January 2020 वेळ 11:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » रस्त्याच्या क्राँक्रीटीकरणाठी पालघरमध्ये वाहतुकीत बदल

रस्त्याच्या क्राँक्रीटीकरणाठी पालघरमध्ये वाहतुकीत बदल

राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर दि. 12 : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदीर चौक या रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आला असुन 75 दिवस या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदीर चौक हा रस्ता मुख्य वर्दळीचे ठिकाण असल्याने वैयक्तीक व सरकारी कामकाजासाठी बोईसर, मुंबई व गुजरात बाजुकडून येणारी वाहने याच रस्त्याने पालघर शहरात येत असतात. तसेच या रस्त्याच्या दुतर्फी मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्ती असून वाणिज्य गाळे व गोडाऊन आहेत. याच रस्त्या लगत एस. टी. बस डेपो व दळणवळणाच्या इतर वाहनांची वाहनतळे आहेत. त्यामळे हा रस्ता 75 दिवसांच्या कालावधीत पुर्णपणे बंद न करता, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हनुमान मंदिर चौकाकडे व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून ते देविशा रोड-पाचबत्ती (हुतात्मा स्मारक) कडे अशी एकेरी (वनवे) वाहतुक सेवा चालु ठेवण्यात येणार आहे.

11 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून 9 जानेवारी 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यावरुन एकेरी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर पोलीस, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने, पोलीस विभागामार्फत परवानगी दिलेल्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

नागरीकांनी वाहतूकीसाठी पुढील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा
छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हनुमान मंदिर चौकाकडे जाणारी एकेरी वाहतुक, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून देविशा रोड – पाचबत्ती (हनुमान स्मारक) कडे जाणारी एकेरी वाहतुक, पालघर शहर व रेल्वे स्टेशन आणि इतर मार्गाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतुक ही पालघर रेल्वे स्टेशन ते पाचबत्ती ते जगदंबा नाका अथवा माहिम वळण व तेथून आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे.

comments

About Rajtantra

Scroll To Top