दिनांक 18 January 2020 वेळ 11:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नायजेरियन भाडेकरुंची माहिती न देणार्‍या दोन घरमालकांवर गुन्हे

नायजेरियन भाडेकरुंची माहिती न देणार्‍या दोन घरमालकांवर गुन्हे

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 12 : परदेशी नागरीकांना घर भाड्याने दिले असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देणे बंधनकारक केले असतानाही मागील 6 ते 7 महिन्यांपासुन नायजेरियन नागरीकांना भाडेकरु ठेऊन त्यांची माहिती न दिल्याने नालासोपार्‍यातील दोन घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजकुमार मोतीलाल यादव व रिजवाना सुज्जादिन शेख अशी सदर घरमालकांची नावे आहेत. राजकुमार यादव यांनी आपला नालासोपारा पुर्वेतील फ्लॅट मे महिन्यापासुन एका नायजेरियन नागरीकाला भाड्याने रहावयास दिला होता. तर अशाचप्रकार मुंबई येथील रहिवाशी असलेल्या रिजवाना शेख यांनी नालासोपारा पुर्वेतील प्रगतीनगर या भागातील फ्लॅट नायजेरियन नागरीकाला भाड्याने दिला होता. मात्र त्याबद्दल तुळींज पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली नव्हती. त्यामुळे या दोन्ही घरमालकांविरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top