दिनांक 18 January 2020 वेळ 11:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेसची निदर्शने

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेसची निदर्शने

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 12 : भाजपा प्रणित केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने अनेक जिवनावश्यक वस्तुंचे अवाढव्य भाव वाढले आहेत. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असुन गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, असा आरोप करुन वाढत्या महागाईसह महिला अत्याचार व नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेसने निदर्शने करून मोखाडा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.

वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, पेट्रोल डिझेल दरवाढ आदी बाबींवर सरकारचे नियंत्रण नसल्याने देशातील जनता मेटाकुटीस आली आहे. भाजपा सरकार सगळे आलबेल असल्याचे चित्र दाखवत आहे. त्यामुळे या सरकारने जनतेच्या मुलभूत समस्यांची सोडवणूक करावी, गोरगरिब जनतेला न्याय द्यावा, महागाईवर नियंत्रण ठेवावे आदी महत्त्वाच्या मागण्यांच्या विरोधात मोखाडा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रथम निदर्शनं करण्यात आली व त्यानंतर नायब तहसिलदार सागर मुंदडा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. लोकसभा व राज्यसभेत पारित झालेल्या नागरिकत्व कायद्याचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष जमशिद (लारा) शेख, जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मनियार, अशोक पाटील, जयराम गवते, अन्सार शेख, वामन दिघा, हिरामण ठोंमरे, युवा कार्यकर्ते सद्दाम शेख, जगन जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top