दिनांक 18 January 2020 वेळ 12:31 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम

हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 12 : हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात 1 ते 31 डिसेंबर दरम्यान ऑपरेशन मुस्कान- 7 ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहिम पालघर जिल्ह्यात देखील सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक पोलीस पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकात 1 अधिकारी व 3 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

या मोहिमेची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात शनिवारी (दि. 7) पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुभाष बन व महिला सहाय्यक कक्षातील महिला कर्मचार्‍यांनी सर्व पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या मुस्कान ऑपरेशन पथकातील अधिकारी-कर्मचार्‍यांना मोहिमेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या आहेत.

ऑपरेशन मुस्कान-7 ही मोहीम पालघर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जास्तीत-जास्त शोध घेऊन ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती पोलिसांतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top