दिनांक 18 January 2020 वेळ 11:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिक्षक सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी मनेश पाटील यांची निवड

शिक्षक सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी मनेश पाटील यांची निवड

प्रतिनिधी/कुडूस, दि. 12 : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदावर वाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मनेश पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही राज्यातील शिक्षकांची नोंदणीकृत व शासनमान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेचे राज्याध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी पालघर जिल्हा शिक्षक सेनेची विद्यमान कार्यकारिणी विसर्जीत करून नूतन जिल्हाध्यक्ष मनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे.

मनेश पाटील यांना शिक्षकी पेशातील दीर्घ अनुभव असून शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जान आहे. शिक्षकांच्या अनेक समस्यांचा त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. शिक्षण क्षेत्राशिवाय तालुक्यातील अन्य सामजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक उपक्रमात त्यांचे सक्रीय योगदान राहिले आहे.

दरम्यान, शिक्षक सेनेच्या या नूतन जिल्हा कार्यकारिणीमध्ये डहाणू येथील जयदीप पाटील यांची जिल्हा समन्वयक, भूषण ठाकूर यांची कार्याध्यक्ष, पालघर येथील जितेंद्र वडे यांची सरचिटणीस, विक्रमगड येथील आत्माराम हरड यांची कोषाध्यक्ष, तर वाडा येथील अविनाश सोनवणे यांची संपर्कप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे .

जिल्ह्यातील शिक्षकांना उशिरा मिळणारे वेतन, गेली पाच वर्षे रखडलेली पदोन्नती, चटोपाध्याय वेतनश्रेणी, पदवीधर शिक्षकांची बंद केलेली वेतनश्रेणी, शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील त्रुटी आदी प्रश्नांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष मनेश पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top