दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमध्ये चोरट्यांकडून बँका फोडण्याचा प्रयत्न

बोईसरमध्ये चोरट्यांकडून बँका फोडण्याचा प्रयत्न

वार्ताहर/बोईसर, दि. 11 : बोईसर येथील एयु स्मॉल फायनान्स बँक तसेच एचडीएफसी ली. बँकेची शाखा मंगळवारी (10) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यशस्वी न झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच पळ काढावा लागला. दरम्यान, बोईसर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन बोईसर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बोईसरमधील गोसालिया पार्क भागातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या व्हाईट हाऊस इमारतीच्या तळ मजल्यावर एयु स्मॉल फायनान्स बँकेची शाखा तर त्याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर एचडीएफसी ली. बँकेची शाखा आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास काही भुरट्या चोरांनी या शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हाईट हाऊस ही इमारत मुख्य रस्त्याला लागून असल्याने रात्री देखील या रस्त्यावर काही प्रमाणात नागरीकांची रेलचेल असते व यामुळेच चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसल्याचे समजते.

दरम्यान, बोईसर परिसरातील वाढते परप्रांतीय लोंढे व वाढत्या नागरीकरणामुळे लाखाच्या घरात गेलेल्या लोकसंख्यावर पहारा ठेवण्यासाठी पोलीस अपुरे पडतात की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top