दिनांक 18 January 2020 वेळ 11:15 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा कृषी कर्मचार्‍यांच्या वेतनाचे भिजत घोंगडे

मोखाडा कृषी कर्मचार्‍यांच्या वेतनाचे भिजत घोंगडे

  • कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता
  • दिवाळीपासून पगाराची आस

दीपक गायकवाड/मोखाडा दि. ११ : मोखाडा तालुका कृषी अधिकारी पदाचा घोळ कायम असल्याने 35 हून अधिक कर्मचार्‍यांचे वेतन रखडलेले आहेत. मात्र वरिष्ठ कार्यालयाला कर्मचार्‍यांसह विकास कामांबाबतही गांभीर्य दिसत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता निर्माण झाली असून त्याचा दुरगामी परिणाम रोहयो सह अन्य विकास कामांवर दिसून येत आहे.

मोखाडा तालुका कृषी अधिकारी पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. या ठिकाणी मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे तात्पुरता पदभार देऊन जुजबी उपाययोजना करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर येथील कारभार सुरळीत चालू होता. मात्र वाड्याच्या उपविभागीय कृषी अधिकार्‍यांनी लहरीपणे अचानक त्यामध्ये फेरबदल करून पदभार हस्तांतरित केल्याने प्रशासकीय तथा आर्थिक व्यवस्थापन मूलतः कोलमडले आहे. तथापी अधिकार्‍यांच्या ’हम करे, सो कायदा’ अशा बेजबाबदार लहरीपणाचा फटका हा कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील विकास कामांना बसलेला आहे. याबाबत कोणत्याही स्तरावरून तोडगा काढला जात नसल्याने याबाबत वरिष्ठांनाच काही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोखाडा तालुका हा अतिदुर्गम आणि मागासलेला म्हणून ओळखला जातो. येथील स्थलांतराचा प्रश्न मोठा आहे. अशा परिस्थितीत 50 टक्के ग्रामपंचायतीच्या कामांपेक्षाही अधिक मात्रेत कृषी विभागाकडून मजूरांना कामांचा पुरवठा केला जाता.े तथापि कृषी विभागाची पदभाराचीच परवड सुरू असल्याने सर्वच बाबतीत अस्थाव्यस्तता आलेली आहे. त्यातच कर्मचार्‍यांचे वेतन दीर्घकाळ लांबल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुरळीतपणा येण्यासाठी खोडाळा ग्रामपंचायतीने सर्व सदस्यांना घेऊन व्यापक जन आंदोलन छेडण्याचा इशारा देऊनही वरिष्ठ अधिकारी अजूनही सुस्तावलेले असल्याने तीव्र असंतोष खदखदत आहे व त्याचा केव्हाही स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top