दिनांक 18 January 2020 वेळ 11:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 16.5 लाखांचा गुटखा पकडला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 16.5 लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 9 : अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील अच्छाड चेकपोस्ट येथे एका आयशर टेम्पोतून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणारा 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

महामार्गावरील अच्छाड चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करणार्‍या तलासरी पोलिसांनी एम.एच 04/जे.यु. 6627 या क्रमांकाच्या संशयित आयशर टेम्पोची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल पानमसाला गुटखा व व्ही-1 तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सदर साठा व टेम्पो जप्त केला केला असुन जप्त करण्यात आलेल्या गुटखा व तंबाखुची बाजारभावानुसार 16 लाख 50 हजार रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक अरविंद श्रीरामबाबु केशरवाणी (वय 20) याला ताब्यात घेतले असुन त्याच्यासह टेम्पोच्या मालकाविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 कलम-26(2), 27, 23, 26(2)(4), 30(2)(ओ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top