दैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या !

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी दैनिक राजतंत्र ” सोशल रिपोर्टर ” ही संकल्पना सादर करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा प्रत्येक जण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरु शकतो.त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. त्यासाठीच्या आमच्या योजनेत सहभागी व्हा!